सोन्यात स्मार्ट गुंतवणूक: Top 5 Gold ETFs with Lowest Expense Ratio

सोनं… भारतीयांच्या मनात रुजलेली एक गुंतवणूक! पण सोन्यात स्मार्ट गुंतवणूक कशी कराल?

सोनं केवळ एक धातू नाही, तर भारतात ते सांस्कृतिक परंपरा, सुरक्षिततेचं प्रतीक आणि आर्थिक अस्थिरतेपासून बचाव करण्याचं साधन मानलं जातं. महागाईविरुद्ध संरक्षण म्हणूनही सोन्याचं महत्त्व मोठं आहे.

आधुनिक युगात, सोन्यात गुंतवणुकीचा एक सोपा आणि कार्यक्षम पर्याय म्हणजे Gold ETFs. यात भौतिक सोन्याची झंझट न करता, स्टॉक मार्केटद्वारे सोन्यात गुंतवणूक करता येते. मात्र, Gold ETF निवडताना Expense Ratio लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. 

या आर्टिकल मध्ये आपण कमीत कमी एक्सपेंस रेशिओ असलेले टॉप 5 गोल्ड ETF पाहणार आहोत, जेणेकरून तुमची सोन्यातील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरेल.

Gold ETF म्हणजे काय?

Gold ETF म्हणजे Exchange Traded Fund, जो शेअर बाजारामार्फत खरेदी-विक्री करता येणाऱ्या डिजिटल स्वरूपातील सोन्याचे गुंतवणूक साधन आहे. या ETF मध्ये गुंतवणूक केली की, ती प्रत्यक्षात 99.5% किंवा त्यापेक्षा जास्त शुद्धतेच्या भौतिक सोन्याच्या आधारावर असते, आणि गुंतवणूकदाराला भौतिक सोनं ठेवण्याची गरज लागत नाही.

Gold ETFs हे BSE आणि NSE सारख्या स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होतात, अगदी शेअर्सप्रमाणे. त्यामुळे त्यांची लिक्विडिटी अधिक असते – म्हणजेच कोणत्याही ट्रेडिंग दिवशी सहज खरेदी किंवा विक्री करता येते. यामध्ये स्टोरेज खर्च, विमा प्रीमियम किंवा मेकिंग चार्जेस लागत नाहीत, जे पारंपरिक सोन्याच्या गुंतवणुकीत मोठे अडथळे ठरू शकतात.

Gold ETF हे सहसा passively managed असतात, म्हणजेच ते सोन्याच्या बाजारभावाशी निगडित असतात. त्यामुळे त्यांचे expense ratio तुलनेने कमी असतात. मात्र, हे खर्च प्रत्येक फंडात वेगवेगळे असतात. कमी खर्च असलेले ETF निवडल्यास दीर्घकालीन परतावा वाढू शकतो.

Read : कमी Budget मध्ये सोन्याची खरेदी – Gold ETFs आहेत ना

Expense Ratio म्हणजे काय आणि तो महत्त्वाचा का आहे?

एक्स्पेंस रेशिओ म्हणजे म्युच्युअल फंड किंवा ETF व्यवस्थापित करण्यासाठी फंड हाऊसकडून तुमच्याकडून आकारले जाणारे  शुल्क. हे शुल्क तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या टक्केवारीत व्यक्त केले जाते आणि ते फंड मॅनेजमेंट, प्रशासकीय खर्च, मार्केटिंग आणि इतर कार्यांसाठी वापरले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, हा तुमच्या गुंतवणुकीतून दरवर्षी कापला जाणारा एक छोटासा हिस्सा असतो.

हा एक्स्पेंस रेशिओ महत्त्वाचा आहे कारण, अगदी छोटासा फरकही तुमच्या दीर्घकालीनreturns वर खूप मोठा परिणाम करू शकतो. कल्पना करा की तुमच्याकडे एक बादली आहे ज्यात पाणी (तुमचा परतावा) जमा होत आहे, पण त्या बादलीला एक लहानसं छिद्र (एक्स्पेंस रेशिओ) आहे. जितकं छिद्र लहान असेल, तितकं जास्त पाणी (परतावा) बादलीत शिल्लक राहील. याच प्रकारे, जास्त एक्सपेंस रेशिओ म्हणजे तुमच्या नफ्यातून जास्त रक्कम बाहेर जाईल.

उदाहरणार्थ, जर तुम्ही ₹१,००,००० गुंतवले आणि एका फंडचा एक्सपेंस रेशिओ १% आहे, तर ₹१,००० खर्च होतील. पण जर दुसऱ्या फंडचा एक्सपेंस रेशिओ ०.५% असेल, तर फक्त ₹५०० खर्च होतील. हा फरक सुरुवातीला कमी वाटत असला तरी, अनेक वर्षांच्या कंपाउंडिंग इफेक्टमुळे हे हजारो रुपयांमध्ये वाढू शकते, ज्यामुळे तुमच्या हातात येणारा अंतिम परतावा लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. म्हणूनच, कमी एक्स्पेंस रेशिओ निवडणे हे तुमच्या गुंतवणुकीचा नफा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Top 5 Gold ETFs with Low Expense Ratio

तुमच्या सोन्यातील गुंतवणुकीचा फायदा वाढवण्यासाठी, कमीत कमी एक्स्पेंस रेशिओ असलेले गोल्ड ETF निवडणे महत्त्वाचे आहे. इथे आम्ही May २०२५ पर्यंत उपलब्ध माहितीनुसार आणि त्यांच्या कामगिरीनुसार निवडलेले टॉप 5 गोल्ड ETF देत आहोत. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक ETF चा नवीनतम factsheet आणि ऑफर डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे. बाजारातील परिस्थितीनुसार एक्स्पेंस रेशिओ आणि कामगिरी बदलू शकते.

1. Zerodha Gold ETF

Expense Ratio – 0.32%

AUM – ₹287 crore

Fund House – Zerodha Mutual Fund

Launch Date – 26 Feb 2024

Ticker – GOLDCASE

2. Mirae Asset Gold ETF

Expense Ratio – 0.32%

AUM – ₹768 crore

Fund House – Mirae Asset Mutual Fund

Launch Date – 15 Feb 2023

Ticker – MAGOLDETF

3. Tata Gold ETF

Expense Ratio – 0.36%

AUM – ₹598 crore

Fund House –  Tata Mutual Fund

Launch Date – 17 Jan 2024

Ticker – TATAGOLD

4. LIC MF Gold ETF

Expense Ratio – 0.41%

AUM – ₹330 crore

Fund House – LIC Mutual Fund

Launch Date – 9 Nov 2011

Ticker – LICMFGOLD

5. 360 One Gold ETF

Expense Ratio – 0.43%

AUM – ₹14 crore

Fund House – 360 One Mutual Fund (आधी IIFL Mutual Fund होती)

Launch Date – 17 Mar 2025

Ticker – GOLD360

आम्ही तुम्हाला 0.50% पेक्षा कमी एक्सपेंस रेशिओ असलेले आणखी 3 बोनस गोल्ड ETFs सादर करत आहोत.

6. DSP Gold ETF

Expense Ratio – 0.45%

AUM – ₹726 crore

Fund House – DSP Mutual Fund

Launch Date – 28 Apr 2023

Ticker – GOLDETFADD

7. Aditya Birla Sun Life Gold ETF

Expense Ratio – 0.47%

AUM – ₹1184 crore

Fund House – Aditya Birla Sun Life Mutual Fund

Launch Date – 3 May 2011

Ticker – BSLGOLDETF

8. Baroda BNP Paribas Gold ETF

Expense Ratio – 0.48%

AUM – ₹91 crore

Fund House – Baroda BNP Paribas Mutual Fund

Launch Date – 19 Dec 2023

Ticker – BBNPPGOLD

वरील बाजारातील माहिती MoneyControl आणि Groww या वेबसाईट्सवरून घेतलेली आहे.

दिलेले Gold ETFs हे शिफारसी (recommendations) किंवा जाहिरात (advertisements) नाहीत. ही माहिती केवळ शैक्षणिक आणि मार्गदर्शक उद्देशासाठी दिली जात आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांसाठी योग्य गोल्ड ETF कसे निवडाल?

गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करताना केवळ कमी एक्स्पेंस रेशिओ पाहून चालणार नाही, तर तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांशी जुळणारा योग्य ETF निवडण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे:

  1. एक्स्पेंस रेशिओ (Expense Ratio): जसेकी आपण आर्टिकल मध्ये पाहिले आहे. नेहमी सर्वात कमी एक्स्पेंस रेशिओ असलेल्या ETF ला प्राधान्य द्या. कारण, हा फंड व्यवस्थापनाचा खर्च तुमच्या परताव्यावर थेट परिणाम करतो. दीर्घकाळात, कमी खर्चामुळे तुमचा निव्वळ नफा लक्षणीयरीत्या वाढतो.

  2. ट्रॅकिंग एरर (Tracking Error): गोल्ड ETF चा मुख्य उद्देश सोन्याच्या प्रत्यक्ष किमतीचा अचूक मागोवा घेणे हा असतो. ‘ट्रॅकिंग एरर’ म्हणजे ETF च्या किमतीत आणि प्रत्यक्ष सोन्याच्या किमतीतील फरक. कमी ट्रॅकिंग एरर असलेला ETF अधिक चांगला मानला जातो, कारण तो सोन्याच्या किमतीतील बदलांना अधिक जवळून प्रतिबिंबित करतो.

  3. लिक्विडिटी (Liquidity): ETF मध्ये खरेदी-विक्री किती सहजपणे होते, याला लिक्विडिटी म्हणतात. ज्या ETF मध्ये जास्त ट्रेडिंग व्हॉल्यूम असतो, ते जास्त लिक्विड असतात. यामुळे तुम्हाला हव्या त्या किमतीत युनिट्स खरेदी किंवा विकणे सोपे जाते आणि स्प्रेड (खरेदी-विक्रीच्या किमतीतील फरक) कमी असतो. मोठ्या AUM (Assets Under Management) असलेले फंड सहसा अधिक लिक्विड असतात.

या तीन मुख्य घटकांचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी योग्य गोल्ड ETF निवडू शकता.

शेवटचा विचार

सोन्यात गुंतवणूक करण्याचा पारंपरिक मार्ग सोडून, आजच्या डिजिटल युगात Gold ETFs हा अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर पर्याय आहे. या ब्लॉगमध्ये आपण भारतामधील सर्वात कमी Expense Ratio असलेले टॉप 8 Gold ETFs पाहिले.

गुंतवणुकीत यशस्वी होण्यासाठी कमी खर्च (Expense Ratio) असलेले ETF निवडणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं, कारण ते दीर्घकालीन परताव्यावर सकारात्मक परिणाम करतात. योग्य ETFची निवड केल्यास तुमचं सोन्यातील गुंतवणूक पोर्टफोलिओ अधिक मजबूत आणि फायदेशीर होऊ शकतो.

सावधपणे निवडा, शहाणपणाने गुंतवा!

 

Disclaimer: ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने आहे. नेहमीच पात्र आर्थिक सल्लागाराचीमदद घ्या, अन्यथा, कोणतेही आर्थिक निर्णय, गुंतवणूकीय निर्णय, व्यापारीक निर्णय किंवा वित्तीय बाजारांशी संबंधित कोणतेही निर्णय (शेअर मार्केट, क्रिप्टो इ.) घेण्यापूर्वी स्वतः त्या विषयाचे योग्य परीक्षण करा.

Leave a Comment

Top 5 Gold ETFs with Lowest Expense Ratio in 2025